``हे डेझी, कुठे आहेस??``(रागात)
``आले रे बाबा, जस्ट ऑफिसमधून निघाली आहे``
``अजून ऑफिसमध्ये, अगं बेवडे...``
``(हसत) नाही रे नेहमी तुझ्या हृदयात असते, आता तुझ्या डोक्यात आहे सो डोकं हलवू नको, स्थिर ठेव. आले बघ दोन मिनिटात बाहेर``.
`` हरामी ये लगेच``.
नेहमीप्रमाणे आजही तिला लेट झालं म्हणून रुसलेला तो तिला स्टेशनवर पाहिल्यावर तिझं लेट झाल्याचं प्रोब्लेम विसरून गेला. कारण आज ती त्याच्या प्रोब्लेमच्या सोल्युशनचा एक भाग होती.
![]() |
| Gorai Beach |
नेहमी तो ऑटोवाल्याला हात दाखवायचा आणि पैसे देण्यासाठी सुद्धा तोच हात पुढे करायचा. ह्यावेळी तिला जरा जास्तच लेट झालं होत त्यामुळे ऑटोवाल्याला हात दाखवून त्याला पैसे देऊन मॅडमनी लेट झाल्याचं हिशोब चुकतं करण्याचं प्रयत्न केला. मागच्या वेळी तिच्यामुळे मावळत्या सूर्याच दर्शन त्यांना घेता आलं नव्हतं आणि पुन्हा आज असं होऊ नये म्हणून तिने तिचे सँडल हातात घेतले आणि पळत पळत जिथे समुद्रीच्या लाटा आपल्याला फक्त हुलकावणी देऊ शकतील पण स्पर्श करू शकणार नाहीत अशा पॉइंटला जाऊन बसली. तिच्या चेहऱ्यावरच्या चंद्राच्या कोमल छटा पाहून तो ही तिच्यावरचं राग विसरला आणि सूर्याच्या छटा पाहण्यासाठी त्याने मान नव्वद अंशात पुढे सरकवली. पाच मिनिटे ते समुद्रात विरघळणाऱ्या त्या तापट सूर्याकडे शांतपणे पाहत होते आणि जसं समुद्र सूर्याला गिळत असतो तसच आपले प्रोब्लेम देखील आपण असेच गिळून टाकू शकतो असा फील त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
आता बऱ्यापैकी अंधार झाला होता. किनाऱ्यावरील प्रेमाची फुलपाखरं गडद अंधाराचा आडोसा शोधत होते तर हे दोघं निरव शांतता शोधत होते. त्या कपल्स आणि यांच्यात फक्त एकच फरक होता; ते म्हणजे कपल्स त्याचं शरीर शेअर करण्यासाठी आडोशाला जात होते आणि हे दोघं आपले प्रॉब्लेम शेअर करण्यासाठी जात होते. तो पूर्ण तयारीने आला होता, एक सिगारेटचं पाकीट आणि तिची आवडती बिअर #Zingaro...
तिच्या बिअरच्या ग्लासमध्ये तो त्याच्या हाताने नशा उतरवत होता आणि त्याच्या निस्तेज ओठांमध्ये चीमटलेल्या सिगारेटला ती लाईटरची साथ देत होती. तो सिगारेटच्या धुराचे फुगे आकाशात सोडत होता आणि चकणा म्हणून ते दोघं एकमेकांचे प्रोब्लेम चघळत होते. ती बिअर पिता पिता बाजूच्या कपल्सकडे बघत होती आणि त्याला बोलत होती,
``हे असं हे शरीर शेअर करून प्रेम वाढत असतं का रे``.
तो, ``अग मंद असं असतं तर सगळ्यात जास्त प्रेम मिळवणारी आणि देणारी व्यक्ती म्हणून लोकांनी पुण्याच्या पेठेतल्या बाईच नावं नसतं का घेतलं``.
``हा रे, मग प्रेम कसं वाढत रे?``
``मे बी, प्रोब्लेम शेअर करून वाढत असेल``
ती, ``पण आपल्यात असं काहीही वाढ होणार नाही हा, we are just best friend for foreverवाले दोन जीव आहोत, फक्त``
आणि दोघेही हसत सुटतात.
![]() |
| Worli Seaface |
बिअरच्या घोटांनी घसा ओला केल्यावर तिने त्याच्याकडच अर्ध सिगारेट घेऊन घसा कोरडा केला. एकच इअर फोन शेअरिंग करून तिला काय बोलायचं आहे ते ती त्याला बॉलिवूड गाण्यांमधून सांगत होती. दोघांनी वाळूवर पाठीचा भार टाकला होता, पायांना संथ लाटांच्या स्वाधीन केलं होत आणि दोन तलव्यांची उशी करून ते लुकलुकनाऱ्या आकाशाकडे पाहत होते. दोघांच्याही आयुष्यात लागलेल्या घोड्यांची गणितं मांडत होते, पण उत्तर काही येत नव्हतं.
शेवटी घरी जाताना त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली का माहित नाही पण त्या प्रश्नांच्या उत्तरासाठी कोण तरी आपला हक्काचा व्यक्ती भागीदार आहे हे त्यांना कळलं होत, त्यामुळे त्यांचे अर्धे प्रोब्लेम तिथेच सुटले होते. घरी गेल्यावर तो त्यांच्या भेटीचे सीन आठवत होता आणि एकटाच हसत होता. आणि स्वतःशीच बोलत होता `बीसी कुठे आपल्याकडे प्रोब्लेम आहेत, सगळे प्रोब्लेम तर संध्याकाळच्या भेटीतच विरघळून गेलेत`. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नव्या प्रश्नांना-प्रॉब्लेम्सला भेटायला गेला, कारण आता त्याच्याकडे हक्काची `शेअरइट`वाली व्यक्ती जी होती.
शब्द आणि फोटो ©मोरे गणेश.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा