कल्पना करा तुम्ही पंचवीस वर्षाचे आहात, एका अनोळखी मुलीसोबत सात दिवस साता-समुद्रापार `मटरगस्ती` करता आणि तीच मुलगी तुम्हाला चार वर्षानंतर भेटते आणि बोलते, `अरे, तू असा नाही आहेस, फेक आहेस तू हा, रिअल मध्ये तू वेगळाच आहेस`.
ती मुलगी जर तुम्हाला सात दिवसांत ओळखत असेल तर तुम्ही स्वतःला पंचवीस वर्ष का ओळखू शकलात नाही?
just imagine, how you feel?
#आयुष्याचा_`तमाशा`.
कॉर्सिका. वेद (रणबीर) आणि तारा (दीपिका) दोघांची भेट. सात दिवस एकत्र फिरतात. एकत्र राहतात आणि एकत्रच खूप मजा करतात. पण एकमेकांबद्दल काहीच खरं सांगत नाहीत. वेद त्याची दबावाखाली जगत असलेली फेक लाईफ भारतात सोडून आलेला असतो आणि आता कोर्सिकात तो त्याची रियल लाईफ जगत असतो; आणि त्याच रियलवाल्या वेदवर तारा फिदा होते. दोघंही भारतात जातात. वेद आपली नेहमीचीच रोबोटिक लाईफ जगत असतो. एकमेकांना एकमेकांबद्दल काहीच माहीत नसतं. तरीही तारा एका पुस्तकाचा आधार घेत वेदचा शोध घेते. तिला तो चार वर्षांनंतर भेटतो. वेद ताराला प्रपोज करतो. तारा नकार देते. कारण वेद कॉर्सिकातून त्याचा आत्मा तिथेच सोडून फक्त शरीर घेऊन भारतात आलेला असतो. आणि इथे आल्यावर त्याने त्याच्या घरच्यांनी, समाजाने, मित्र मंडळींनी बनवलेला टीपिकल आत्मा मेंदूत टाकून एक रोबोटिक लाईफ जगत असतो. झालं मग. लव्ह स्टोरीला कॉमा मिळाला आणि सुरुवात झाली हिरोच्या सेल्फ डिस्कवरीला.
प्रत्येकाचं बालपण हे सुखाचं गेलेलं असतं. कारण लहानपणी आपल्यावर फक्त आपल्याच मुखवटा असतो त्यामुळे आपण सगळ्यांसाठी स्पेशल असतो. पण जसं जसं मोठे होत जातो तस तस समाज, फॅमिली त्याचे मुखवटे आपल्यावर चढवत असते त्यामुळे आपण परिस्थितीला शरण जाऊन आपण आपला ओरिजनल मुखवटा काढून टाकतो आणि इच्छा नसतानाही परिस्थितीचा मुखवटा परिधान करतो. लहानपणी आपल्या एखाद्या स्पेशल कौशल्यामुळे जे घरवाले आपल्याला अजून स्पेशल बनवतात तेच जरा मोठं झालं की जबाबदारीच गाठोड डोक्यावर टाकून समाज्याच्या रेसमध्ये धावायला सांगतात. कधीही न संपणारी रेस, कोणत्या प्रश्नांची उत्तरे न देणारी रेस, आपण बाहेरून जगतोय असं दाखवणारी; पण आतून स्वप्न, इच्छा, आनंद मारणारी भयानक रेस. आपण पळतोय. कारण थांबून दोन घटका विचार करायची अनुमती आपल्याला आपली परिस्थिती देत नसते. तमाशाच्या भाषेत सांगायचं झालं तर, `अंदर से कुछ और होते हैं हम, और बाहर से मजबूर`.
थोडक्यात लाईफच्या रेसमध्ये पळताना थोडा वेळ काढून, परिस्थितीला फाट्यावर मारून, घरच्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून स्वतःचा शोध घ्या. स्वतःची रेस स्वतः ठरावा, आणि मग मागे न वळून पाहता त्या रेसमध्ये जीव तोडून पळत सुटा, तुम्ही नक्की पहिले असाल. हे सांगणारा #तमाशा.
चित्रपटाची गाणी ओके आहेत, इम्तियाज अलीची छाप आहे, रणबीर आणि दीपिकाची अफलातून ॲक्टींग आहे, एक चांगला मेसेज तमाशातून दिलं गेलं आहे तरीही तमाशा थिएटरला चाललं नाही कारण तमाशा पाहण्याचा नाही तर फील करण्याचा विषय आहे. एकदा पाहून वेळ फुकट घालवण्यासाठी तमाशा पाहू नका, कारण एक वेळ पाहून तुम्हाला काहीही कळणार, नाही सो दोन-तीन वेळा पहा. बाकी,
वहीं कहानी फिर एक बार,
मजनू ने लिए कपड़े फाड़,
देख तमाशा बीच बाज़ार।
#Tamasha #5yearsoftamasha
©मोरे_गणेश.


1 टिप्पणी:
❤
टिप्पणी पोस्ट करा