.
दुपारी ३.३० वाजता, काहीसं. समोर जगाला शांतता शिकवणारा अथांग समुद्र आणि समुद्राच्या समोर जगाला रोमान्स शिकवणाऱ्या हीरोचा बंगलो. मन्नत. आणि ह्या दोघांच्यामध्ये काही काळासाठी वेळ, पैसा, शरीराचा पार्श्वभाग (कारण पुढे- पुढे येणाऱ्यांना ह्याच भागावर पोलीस कुत्र्यागत मारत होते) आणि बरंच काही शाहरुखच्या प्रेमापोटी गहाण ठेवून आलेली मंडळी होती. अर्थात मी पण त्यातलाच एक. माझे मित्र शाहरुखचे फॅन आणि की माझ्या मित्रांचा. त्यामुळे इच्छा नसतानाही मला जावं लागलं होत. शंभर एक खाकी वर्दीचा ताफा होता. काही सेकंदाची झलक पाहण्यासाठी कोणी दिल्लीतून आला होता तर कोणी गावच्या गल्लीतून. काही सेकंदासाठी शाहरुखला हृदयात साठवण्यासाठी कोणी पहाटेपासून ढुंगण टेकून बसलं होत तर कोणी गां***वर फायबरचे वळ उठवून घेण्यासाठी पण तयार होत. गर्दी जास्त झाल्यावर पोलिसांनी सगळ्यांना किनारपट्टीच्या दिशेला लोटून दिलं. सगळ्यांचे डोळे मन्नतच्या स्टँडकडे खिळून राहिले होते.

आणि थोड्या वेळाने बॉलिवूडचा किंग लाईव्ह आलाच. गुलाबी रंगाचा शर्ट घातलेला तो पांढरा मुखवटा दिसतोय ना दिसतो तर सगळी पब्लिक धावत सुटली. समोरचा हायवे क्रॉस करताना ना आता अपघाताची जाणिव होती ना पोलिसांच्या दांडूक्याची भीती होती. बादशहाला फुल्ल एचडीमध्ये पाहण्यासाठी प्रत्येकजण प्रत्येकाला रेटत होता, छेदत होता. पोलिसांनी काठी आकाशात तानल्यावर दोन पावलं शरीर मागे येत होत आणि पुन्हा डबल जोशाने चार पावलं पुढे जात होत, कारण पुढे होता किंग ऑफ हार्ट. मी शाहरुखचा इतकं पण मोठा फॅन नव्हतो त्यामुळे मी जास्त जवळ न जाता लांबून हे सगळं अनुभवत होतो. दोन सेकंद शाहरुखकडे पाहिलं; एका सेकंदात मोबाईलमध्ये त्याला बंद केलं आणि पब्लिकमध्ये शाहरुख पाहण्यात दंग झालो. हातात शाहरुख, गळ्यात शाहरुख, तोंडात शाहरुख, डोक्यात शाहरुख, मनात शाहरुख. सगळीकडे शाहरुखच-शाहरुख.
एका SRKसाठी माणसं इतकी वेडी असू शकतात हे मी ऐकलं होत त्या दिवशी प्रत्यक्ष अनुभवलं. थरारक होत, आल्हादायक होत, स्पेशल होत. आता ज्या माणसाला इतके फॅन्स मिळतात तर तितके हेटर्स असणे पण साहजिक आहे. कोणाला माहित होतं, एक फुटपाथवरचा पोरगा इतका मोठा होईल की एक दिवशी त्याच्या वाढदिवसाला जगातील सगळ्यात उंच इमारत बुर्ज खलिफा त्याला शुभेच्छा देईल, जो की अजूनपर्यंत दोनच भारतीयांना हा बहुमान मिळाला आहे. एक महात्मा गांधी आणि दुसरा फुटपाथवरचा हा अवलिया. आता आवडणे न आवडणे हे ज्याची त्याची मर्जी आहे पण आज तो ज्या पोझिशनवर आहे त्या पोझिशनला आपण आदर तर नक्कीच देऊ शकतो. तुम्ही त्याच्या `नावामध्ये` त्याला पहायला गेलात तर तो तुम्हाला कधीच दिसणार नाही. त्याच्या मेहनतीमध्ये, टॅलेंटमध्ये, विश्वासामध्ये पाहिलत तर एकवेळ तो तुम्हाला जाणवेल. आणि तिथेही तुम्हाला तो नाही कळलं तर तुम्ही त्याच्या फॅन्समध्ये पहा. नक्की तुम्हाला तो सापडेल, आणि समजेल.
#Happy_Birthday #SRK
©मोरे_गणेश.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा