हा... मी केलंय संपूर्ण जगाला दोन मिनिटांसाठी RIP, आणि तुम्हीही हा ब्लॉग वाचून करू शकता; RIP to the whole world for 2 min...
#दोन मिनिटांसाठी RIP.
परीक्षा; मग ती UPSC असो किंवा साधी UT (आमची सेमीस्टर होती) थोड दबाव, मानसिक ताण आणि खूप सारा त्रास हा असतोच. त्यात आम्हा B.Sc. वाल्यांना विद्यापीठ काय समजतात माहित नाही, मोजून चार दिवसांत अख्खी सेमीस्टर घेऊन परीक्षेच्या दिवशी सुरू झालेला कसोटीचा सामना 5 व्या दिवशी पाहण्यासाठी मोकळं करतात. सेमीस्टरमुले आलेला हा दबाव कुठे तरी उंच, निसर्गाच्या सानिध्यात, जिथे आपल्याला डिस्टर्ब करायला कोणीही नसेल त्या ठिकाणी रिलीज करायचं होत. त्यासाठी आम्ही `भैरवगड ट्रेकिंग` हा पर्याय निवडला. इतर दुसऱ्या ठिकाणी फिरण्यासाठी आमच्याकडे खूप पर्याय होते पण आम्हाला माणसांची भाऊगर्दी नको हाती, गाड्यांवर ढांग टाकून नुसती रपेट मारायची नव्हती की आम्हाला कोणत्या विज्ञानाचा आविष्कार करून करण्यात आलेल्या पर्यटनस्थळाला भेट देयाची नव्हती. आम्हाला फक्त स्वतःला स्वतःची दोन मिनिटे देयाची होती तीही निसर्गाच्या गाभ्यात जावून, निसर्गाच्या सोबत.
सकाळी ७ वा. आमची भटकी टोळी जाण्यासाठी गडाच्या दिशेने निघाली. गुलाबी थंडी होती पण फिरायला जायची आमची ऊर्जा त्या थंडीला धूप घालत नव्हती. आमचा एक मित्र हृदयापेक्षाही गाडीला जास्त जपतो त्यामुळे तो एकटा आणि बाकीच्या दोन बाईकवर दोघं–दोघं असे पाचजण `टपोरी पोरं` ह्या नावाला अंशतः शोभेल अशी मज्जा करत चाललो होतो. पाते ह्या गावापर्यंत पोहचलो आणि मग तिथून सुरू झाली अडीच तासाची पायवारी. पायथ्यापासून एकदा वर नजर फिरवली आणि मनात सहजच विचार आला, आपल्याला आईने दुकानावरून एखादी वस्तू आणायला सांगितली तर आपले पाय गळ्यात येतात असं सांगून आपण आईला शांत बसवतो मग हा इतका खडतर प्रवासाचा गड कोणीही सर करायला सांगितल नाही तरीही आपण अगदी आनंदाने वर चढणार आहोत.का? कोणासाठी? आणि ह्या सगळ्याची उत्तर वर चढल्यावर मिळाली. शे–दीडशे पायऱ्यांची पाखाडी चालत पुढे गेलो. पुढे एक विहीर होती, शहरात थरावर थर लावून ज्या प्रकारे इमारती रचल्या जातात तशी तिथे बेडकांची एक इमारत दिसली. शेजारी वृध्द माणसाची हाडं ज्या प्रमाणे बाहेर पडावी त्याप्रमाणे झऱ्याची अवस्था झाली होती; सगळे काळे भोर दगड बाहेर पडले होते. एक टप्पा सर केल्यावर वर थोडी सपाट जागा आहे, तिथून खाली पाहिलं आणि स्वतःशीच पुटपुटलो , `हेच का आपलं कोंकण, कसलं भारी आहे ना` आता ते सगळं वर्णन करायला मला अजुन एक दुसरा ब्लॉग लिहावा लागेल. थोडा वेळ पाणी पिण्यासाठी बसलो आणि तोच एक मित्राला फोटो काढायची खाज सुटली, आणि तीच खाज एखादा संसर्ग रोग जसा पसरावा तस आम्हाला सुद्धा त्या मित्राचा संसर्ग झाला. खाज सुटली ती फोटो काढायची. मित्राचा Redmi मोबाईल होता म्हणजे आमच्या सारख्या गरिबांचा DSLR म्हणाच की. खूप फोटो काढले निसर्गाला कवेत घेऊन, त्याच्या डोक्यावर बसून आणि त्याच्या पायावर डोकं ठेवून सुद्धा. आणि तिथून पुढे हा एका तासाचा खरा ट्रेकिंगचा आनंद देणारा प्रवास होता. तोही पार केला आणि गडाचा मुख्य भाग आला. गडाच्या दुसऱ्या बाजूला एक थंड पाण्याचा कुंड आहे ते पाहण्यासाठी आम्ही गेलो. सर्वोच्च ठिकाणी आता आम्ही होतो. सह्याद्रीची छोटी–छोटी शिखरं, पांढरी भुकटी पसरावी तस धुक पसरलं होत, तुमच्या शहरातल्या इमारती इथल्या दगडांत आपण सहज घडवू इतकी अभेद्य दगड, स्विमिंग पूल मध्ये आपण जसं पोहतो तसे पक्षी आकाशात पोहत होते. पण माणसांप्रमाणे नव्हते ते, त्यांना ना पडण्याची भीती होती ना त्यांना कुणाला पाडण्यासाठी कोणाशी स्पर्धा करावी लागत होती. डोळ्यासमोर सेल्फीच्या पेपर मधील बातम्या येत होत्या पण काही झालं तरी सेल्फी आणि फोटो घेण्याचा मोह आवरत नव्हता. कारण तुमचं विज्ञान कितीही पुढे गेला तरी असे हे अनुभव तुम्ही घरी चार बाय चारच्या खोलीत घेऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला निसर्गाच्या पायशीच याव लागेल. उन्हात सुद्धा कुंडात पाणी खूप थंडगार होत. तो आमच्या ट्रेकिंगचां शेवटचं पॉइंट होता. मित्रांना सोडून थोडा शेजारी गेलो आणि आणि एका दगडावर जावून बसलो निवांत बसलो. पुढ्यात, डोळ्यात, डोक्यात, मनात सगळीकडे निसर्गच होता. त्यावेळी सगळं जग माझ्यासाठी R.I.P. होत निसर्गाच्या हृदययाची स्पंदन माझ्या हृदयाच्या स्पंदनांना भिडत होती. आणि खऱ्या अर्थाने माझ्यासाठी मी मला निसर्गाच्या सोबत दिलेली दोन मिनिटे होती. कोणीही नव्हतं माझ्यासोबत ना कुटुंब, ना मित्र, ना माझी स्वप्ने, त्या शहरात पैसे, मान, तंत्रज्ञान, यश, स्पर्धा यांच्या मागे लागलेल माझ शरीरही माझ्या सोबत नव्हतं. त्यावेळी फक्त आणि फक्त मी (आता मी म्हणजे तरी कोण हे तुम्हीच शोधा) आणि निसर्ग होतो. जसं एखादी प्रेयसी प्रियकराच्या मिठीत विसावते तसां मी निसर्गाच्या मिठीत विसावलो होतो.
असं होत हे आमचं ट्रेकिंग. ह्या निमित्ताने सगळ्यांना इतकंच सांगेन की तुम्ही दोन अक्षरं कमी शिका, दोन पैसे कमी कमवा, एकवेळ तुम्ही दोन माणसं कमी जोडा पण दिवसातली दोन मिनिटे स्वतःला द्या. दोन मिनिटे देवून टाका संपूर्ण जगाला RIP, असं जेव्हा कराल तेव्हा ती दोन मिनिटे तुमचीच असतील कारण तेव्हा ह्या जगात कोणीच नसेल. असाल ते फक्त तुम्हीच. आणि हा अजून एक
`जन्माला आलोय म्हणून जगायचं नाही तर, जगण्यासाठीच जन्माला आलोय अशा तोऱ्यात जगायचं`
#भटक्या,

©मोरे_गणेश.

1 टिप्पणी:
तु केलेल्या वर्णानाने आम्हाला पण ट्रेकिंग केल्याचा भास झाला..
टिप्पणी पोस्ट करा