अल्बर्ट आईन्स्टाईनच्या `Imagination power is greater than knowledge` ह्या वाक्याला डोक्यात भिनवून आणि DBJ कॉलेजचे Days हृदयात रमवून लिहिलेला हा ब्लॉग...
#Days, DBJ आणि `ती`...
डिसेंबर. पांढऱ्या द्रव्यरुप भुकटीची चौफेर उधळण, शेतात सुवर्णकणांचा ऐटदार डौलारा, वृक्षांचा बहरण्यासाठी दाटून आलेला ऊर, सकाळच्या चहाच्या कपाने मिळणारी ऊब रात्री मदिराच्या ग्लासाने चार्ज करणे (वयोमानानुसार) आणि आपसुकच धगाट्याच्या नृत्याकडे हातांची मसाज करण्यासाठी वळणारे आपले पाय. ही सगळी लक्षणे म्हणजे चाहूल गुलाबी थंडीची. आणि ह्या थंडगार थंडीतच बहुतेक कॉलेजमध्ये विद्यार्थांच्या कलागुणांना वाव मिळण्याचा, ऐटीत मिरवण्याचा, वर्षभराच टेंशन चार दिवसात घालवण्याचा एक हॉट फेस्टिवल म्हणजे त्या कॉलेजचे Days. आणि ज्या सगळ्याला अमाच कॉलेज अपवाद नव्हत. डिसेंबर महिन्यात कोणी Days हा शब्द उच्चारला की त्याला प्रतिउत्तर म्हणून तुम्हाला DBJ हाच शब्द मिळेल. २० ते २५ असे पाच दिवस रंगलेले days त्यातील पहिले दोन औपचारिक दिवस सोडले असता बाकीचे तीन दिवस खऱ्या अर्थाने days प्रमाणे ते तीन दिवस साजरे झाले. तिसऱ्या दिवशी सकाळी कॉलेज ते गणपती मंदिरापर्यंत निघालेली दिंडी, त्या दिवशीच ट्रॅडिशनल डे असल्याने एक दिवस का होईना आम्हाला आमच्या संस्कृतीच डोळे भरून दर्शन घेता आल. गुढग्याच्या मेंदूला हवा लागावी म्हणून फाटक्या पँट वापरणारे त्या दिवशी सदरा–लेंगा घालून आले होते आणि डोक्यावर यो–योची नाही तर महाराष्ट्रीयन फेटा गुंडाळलेला होत. इतरवेळी अंगप्रदर्शन (अपवाद) करणाऱ्या मुलींनी ह्या दिवशी मात्र नऊवारी साड्यांच प्रदर्शन भरवल होत. ढोल ताशांच्या नादात निघालेली दिंडी रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक माणसाला गाडीला ब्रेक मारण्यासाठी भाग पाडत होती. चेहऱ्याला नावाची ओळख पुरेशी नसल्याने Mr/Miss DBJच्या पेटंटकरिता देखण्या (जरा हुषार) बाहुल्या आणि बावल्यांची स्पर्धा म्हणजे beauty contest; ती दुपारी पार पडली. एकमेकांची धूनी–भांडी चार चौघात काढण्याचा कार्यक्रम (Fish Pond) संध्याकाळी झाला. नेहमी आपल्याला त्यांच्या तालावर नाचवणानाऱ्या शिक्षकांना फिल्मी गाण्यांनी त्यांना नाचवल; शिक्षकांची gathering. चौथ्या दिवशी जीन्स डे होता तो काय आम्ही रोजच साजरा करतो आणि दुसरं म्हणजे गॉगल डे , माझ्यासाठी चष्मा डे आणि शेवटचं म्हणजे ग्रुप similarity डे होता, आमच्या क्लासमध्ये चार पोरं (ती पण कधी daysला नाही येत) त्यामुळे पहिला प्रश्न ग्रुपचा आता तोच नाही तर similarity कुठून आणायची हो. त्यामुळे हा दिवस असच गेला. काळया रस्त्यावर रंगीबेरंगी फुलपाखरं (मुली) तुरतुरत होती, स्पोर्ट्स मैदानावर DSLR कॅमेराचा आविष्कार चाललं होत, जोडपी छानपैकी आमचं मनोरंजन करत होते, बाहेरच्या कॉलेजची पोरं नट्यांच्या दुनियेत जाव आणि त्यांना नजरेने न्हाहाळत बसावं तस मुलींकडे पाहत होते, काही पोरं कार्यक्रमाला बसून जिवाच्या करारीवर फक्त खुरच्यांना ऊब देत होते तर काही पोरं घरी राहून बेडला. असं होता चौथ्या दिवस.
पाचवा आणि शेवटच्या दिवस खूप खास होता माझ्यासाठी. एक म्हणजे मला बक्षीस मिळणार होत आणि दुसरं म्हणजे त्या दिवशी रोज डे होता. `रोज` दिसणारं आपलं माणूस (माणूस म्हणजे `मुली` हा गोडगैरसमज आहे ) `रोज डे`ला तरी भेटेल आणि आपल्याकडील `Rose`चा भागीदार बनेल ह्या आशेवर कॉलेजच्या परिसरात आलेले बे`रोज`गारडे Rose Dayची शोभा वाढवत आहेत. आणि त्या दिवशी गुलाबाच आणि मुलगीचा `भाव` बघायचा नसतो. मला तर काय बक्षीस मिळालं होत आणि त्या सोबत एक आयता गुलाब पण मिळालं होत हा बस फक्त आजच्या दिवसात त्या गुलाबाला कोण तरी मालकीण पाहिजे होती इतकंच. हा तस आदल्या रात्री थोडी आशेची किरण माझ्या हृदयावर पडली होती पण आज `ती` येईलच ह्यावर काही भरोसा नव्हत. हंगर कॅफेत ठरल्याप्रणे बसलो होतो. शरीर फक्त केफत बसलं होत पण मेंदू, मन, डोळे सगळेजण कॅफेच्या दरवाज्यावर तिच्या येण्याची वाट पाहत होते. २० मिनिटे वाट पहिली आणि एका क्षणाला असं वाटलं मायला राहुदे. हे गुलाब घरी जावून फुलदाणीत ठेवू, पुढच्या वर्षी पुन्हा गुलाबासाठी बक्षीस मिळवू पण आता ह्या गुलाबाला मालकीण मिळवून देण्याचं नाद सोडूया, पण नाही आली ती. फेंट जांभळ्या रंगाची मॉर्डनसाडी, बॉर्डरलेस चष्मा, ओठांवर गर्द लाल रंगाची लाली, झुमझुमवाले कानातले, केसांत चायनीज स्टिक, एका हातात ओप्पो A7 आणि दुसऱ्या हातात लाल गुलाब. गालावरची नाजूक खळी, नखांवरती अवतरलेली फुलपाखरांच्या पंखांवरची ती रंगरंगोटी, उजव्या हाताला टीचभर काचेवाला घड्याळ, डाव्या हातात ब्लॅकी कडा, आणि तिझ्याकडे बघणाऱ्या पोरांना भिक न घालणारा तिझा तो फुल्ल Attitudeवाला चेहरा. सगळं कसं एकदम स्टॅंडर्ड. हसत हसत आली, बसली पुढे. पहिल्यांदा हात मिळवून अभिनंदन केलान. पार्टी म्हणून पिझ्झा, बर्गर ऑर्डर केले आणि बातचीत चालू. तिझ बोलणं, आदल्या दिवशीचा आशेचा किरण, तिने आणलेलं लाल गुलाब. सगळं कसं मनासारखं होत होत. बस काही सेकंदाचा अवधी होता, तिला आयुष्याची नाही तरी त्या गुलाबाची मालकीण नक्कीच बनवून घेणार होतो आज. तीही तशी माझ्याकडे आशेने पाहत होती, तिझ्या डोळ्यात डोळे टाकून पाहिलं, गुलाबाला एकदा गोंजारल, दिर्घ श्वास घेऊन छातीतली भीती चेहऱ्यावर आणून न देता गुलाब देण्यासाठी हात पुढे करणार तितक्यात पुढ्यात मम्मी आली मला `` काय तर झोपायच नाही का, वाजले बघ किती``. आणि शुद्धीत आलो. पुढ्यात न्यूजपेपर पसरला होता त्यावर मोबाईल होता. घड्याळात रात्रीचे 2.35 झाले होते.
एक दिवसही मी Days ला गेलो नव्हतो तरी मी माझे days कल्पनेच्या जगात असे रंगवले आणि तुमच्या वास्तवातल्या जीवनातले days सुद्धा ह्यापेक्षा काही वेगळे नसावे.
#धन्यवाद _/\_
©मोरे_गणेश.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा