नित्यनेमाप्रमाणे याही वर्षाची दिवाळी आली ते पण खूप सारे `खास` असे गिफ्ट व्हाउचर घेऊन. म्हणजेच नेहमीसारखं आपण ह्या दिवाळीत `पाऊस` लावू शकत नाही कारण अगोदरच पावसाने आपले लावले आहेत, फटाकेविक्रेत्यांसाठी फटाकेबंदीमुळे `काळी` दिवाळी तर ग्राहकांसाठी GST मुळे डोळे `पांढरे` करायला लावणारी दिवाळी. चीन डोकलामच्या भूमीवर चिकटून बसल्यानंतर चायना वस्तूंवर बहिष्कार टाकणारे आज आपला स्वाभिमान टाकून बाजारातल्या चायना वस्तूंना चिकटून बसलेत; म्हणजे भारतवासियांचे `चायना` (फार काळ न टिकणारे) भारतप्रेम दाखवून देणारी दिवाळी. डिजिटल इंडियाच्या जगात ऑनलाईन शॉपिंग झाल्यानंतर ऑफलाईन(COD) पेमेंट करून शॉपिंग कंपण्यांवरची विश्वासहार्यता दाखवून देणारी दिवाळी. म्हणजेच ह्या दिवाळीत GST चा महागडा बार, चायना वस्तूंवरचा फुसका बार आणि शॉपिंगचा लवंगी बार (वाजेल की नाही यात शंका) फूटत आहेत पण या सगळ्यांवर भारी पडतोय तो कोकणातला पाऊस बार (सध्या तरी इट्स ओके आहे).
लेकिन आपुन को क्या सिर्फ़ ढ़ेर सारी शुभेच्छा ही देनी हैं| अश्या या खास दिवाळीच्या खास माणसाकडून दीपावलीच्या खास शुभेच्छा...आणि या शुभेच्छांवर माझ्या मनातून पाझरलेला संदेश/उपदेश/विनंतीचा बोनस; दहा फटाक्यांच्या वातीला प्रदूषणाच्या दहा काढीपेटी लावताना गरिबांच्या झोपडीत आपुलकीच्या पणतीला एक काढीपेटी लावायला विसरू नका, कारण त्या पणतीचा प्रकाश जरी तुमच्या चायनाच्या रोषणाईप्रमाने झगमगता नसेल पण त्याची सुखदाऱ्यता तुमच्या आणि त्यांच्या जीवनात नक्कीच मोठी असेल. कारण प्रदूषणमुक्त दिवाळीपेक्षा गरिबामुक्त दिवाळी मला जास्त सतावतेय. पुन्हा एकदा परंपरेनुसार दीपावलीच्या शुभ शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला वगैरे...वगैरे...वगैरे...@Happy_Diwali..!
#खास दिवाळी_विशेष शुभेच्छा_बोनस संदेशाचा.
©मोरे_गणेश.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा