७ मार्च, २०१८

#`बेकार` शिक्षणदिन.

      आज राष्ट्रीय शिक्षणदिन आहे. शिक्षविभूषित मुलांनी शिक्षणाचे गोडवे गायचा दिवस. पण आज विद्यार्थी शिक्षणाचे गोडवे कमी पण कोडवे जास्त ऐकवताना दिसत आहे. आज शिक्षणाची आवस्था ही `बढा घर पोकळ वासा, वारा जाई भसा भसा` ह्याप्रमाणे काहीशी झाली आहे. कारण  आमच्या हातात जरी विद्यावाचस्पती (P.Hd.) सारख्या जरी डिगर्या असल्या तरी आम्हाला एखाद्या वनवास्याप्रमाणे भटकाव लागत आणि अनुभवाची जोड असली तर जॉब मिळतो नाहीतर फक्त P.Hd (अन्य डिगर्यांचे) पेटंट घेऊन नावाच्या पुढेमागे चीपकाव लागतं. आजचे शिक्षण हे गुणांचे प्रशस्तीपत्रक देण्यापुरते राहील आहे. असे गुण ज्यांची किंमत कागदावर जास्त असते आणि बाहेरच्या जगात कमी. आजचा विद्यार्थी हा गुणांच्या मागे जीव तोडून धावत आहे त्यामुळे त्याच्या ज्ञानाच्या कक्षा आकुंचित पावत आहेत. विद्यार्थी आपल्यातील सुप्त कौशैल्यांना कधी वावच देत नाही. कारण त्याचे आयुष्यात एकच उद्दिष्ट असते ते म्हणजे दोन अक्षरं शिकून चार पैसे कमावणे नी घरच्यांची उपजीविका करणे. ह्या गोष्टीला विद्यार्थी जितका जबाबदार  आहे त्याहून जास्त समाज आणि महाविद्यालये जबाबदार आहेत अस मला वाटतं. गुणांच्या मागे झपाटलेली पोरं दहावीत/बारावीत शंभर नंबरी अंक मिळवतात ह्यामुळे आपला देश काही वर्षातच महासत्ता होणार ह्या गोड गैसमजात समाज धुसत आहे. शालेय शिक्षण झाल की मग आमचं पदवी शिक्षण सुरू होतो. बारावीच्या त्या जड असलेल्या प्रशस्तीपत्रकला उच्च शिक्षणाची जोड देण्यासाठी आम्ही झगडत असतो. पण आज अनेक महाविद्यालये NAAK ची टीम येणार म्हटल्यावर महाविद्यालयाचे नाक साफ करायला जातात, व NAAK आल्यावर त्यांच्यासमोर नंदनवनाचा देखावा उभा करवून  `A`, `A+` यांसारख्या ग्रेड मिळवून घेतात. ह्या भूलभुलैयाला भुलून खूप विद्यार्थी अश्या महाविद्यालयात दाखला चढवतात. पण खरंच ही महाविद्यालये विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी, त्यांना समाजातील एक जबाबदार नागरिक बनवण्यासाठी परिपूर्ण आहेत का हा संशोधनाचा विषय आहे. एका नामांकित इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या अहवालानुसार आयआयटी मधील तीनपैकी एक विद्यार्थी हा बेरोजगार आहे. आज आयआयटी सारख्या नामांकित संस्थानांची ही अवस्था असेल तर आपण विद्यार्थ्यांना कोणते शिक्षण देत आहोत ह्याबद्दल चिंतन करण्याची हीच खरी वेळ आहे. अनेक महाविद्यालयात प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थी कोंबल्याने वर्गात मुलांचा जीव गुदमरतोय कि काय म्हणून अनेक विद्यार्थी खाजगी शिकवणी लावतात. आणि ह्या सगळ्यात महाविद्यालये कुठे तरी कमी पडतात अस दिसून येत. बेरोजगारीचा दर कमी करण्याची जबाबदारी जितकी सरकारची आहे तितकीच जोखीम महाविद्यालयांनी देखील उचलली पाहिजे. नोरक्या निर्माण करण्याच काम हे जरी सरकारच असलं एक कुशल नोकर तयार करण्याची जबाबदारी हि शैशाणिक संस्थानांची आहे. स्वामी विवेकानंद म्हणत असत कि, शिक्षण हे ‘माणूस’ निर्माण करणारे आणि ‘चारित्र्य’ घडवारे हवे पण चालू परिस्थिती पाहता आमच्या शिक्षणसंस्था आम्हाला पोटाची खळगी भरणारे शिक्षण सुद्धा देऊ शकत नाही हि मोठी खंत आहे. अश्या या
#`बेकार`_शिक्षणदिनाच्या_चांगल्या_शुभेच्छा..!
©मोरे_गणेश.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: