२ मार्च, २०१८

#गुणांची खिरापत.

 गुणांची खिरापत...
आजच दहावीचा `फुगा` फुटला ; म्हणजेच वर्षभरात किती हवा भरली फुग्यात हे आज समजल.फुग्यात भारदार हवा भरलेल्या पोरांचं अभिनंदन ( रितीनुसार ).आणि बाकीच्यांनी पुन्हा एकदा दीर्घश्वास घेऊन हवा भरायला लागा ;म्हणजे आगामी परीक्षेत फटाके फोडल्याप्रमाने जोरात आवाज येईल.
दहावीच्या निकालावर माझे वयक्तिक मते जी तुम्हाला पटाविच अशी काडीमात्र इच्छा नाही.
#1 दहावीचा निकाल लागल्यानंतर दहा दिवसांनंतर बाजारात कोथिंबीरच्या जुडीला जेवढी किंमत मिळते तेवढी किंमत ह्या निकालाच्या कागदाला सुद्धा मिळत नाही ( काही कागद अपवाद असतात ); म्हणजेच त्या कागदाचा उपयोग पुढील इयत्तेच्या एडमिशनसाठी मात्र नक्की होते.
#2  दरवर्षी महाराष्ट्रात `कोंकण` बोर्ड अव्वल येत असलं तरी कोकणाची पोर किती हुशार आहेत हे कोंकण सोडून संबंध महा.ला माहित आहे ; भविष्यात ते दिसतच म्हणा.(मी कोंकणी आहे )
#३ `13% अभियंते फक्त कार्यशम`,`बेरोजगरीचा दर 0.7% ने वाढला`,`हतात degree असून सुध्दा घरी बसव लागत` ह्या सगळ्यांची पाल~मुळ ह्या निकालात रोवली जातात...
दहावीची परीक्षा घेणे म्हणजे `ठोकले` निर्माण करण्याचं काम आहे.साचा आमचा तयारच असतो.असो..
शेवटी `वपू`ना स्मरून ``कबुतराला गरुडाचे पंख लवता येतीलही,पण गगनभरारीचे वेड हे रक्तातच असावं लागतं.कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.``
समजलं ना,अर्थातच तुम्ही टॉपर अहात.तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप (सावधानी) शुभेच्छा.
©मोरे गणेश.(तीन वर्षाचा अनुभव...फक्त....)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: