७ मार्च, २०१८

#स्वप्न.

मुंबापुरीत इमारतींच्या कचऱ्यात आपला थोडा वाटा असावं; हवेत तरंगणारा (>25 मजला) काँक्रिटचा बॉक्स; बाल्कनीत पायाचा आधार घेत दोंनीही हाताचा भार ग्रील वर टाकत, डाव्या हातात हिंदू पेपर आणि उजव्या हातात मगाएवढ्या कपात नगभर काॅफी; आणि त्या गुलाबी थंडीत डोळे मात्र गर्द धुक्यात मुंडकी वर काढून बसलेल्या बिल्डिंग कडे; कान कृत्रिम पक्षांच्या (विमान) घोंगावाकडे आणि मन मात्र स्वयंपाकघरातील `ओ` आवाजाला फाट्यावर मारत आयुष्याचा पाढा वाचनात दंग.
#सगळा_ खटाटोप_स्वप्न_`स्वप्न`_न_राहण्यासाठी..!
©मोरे_गणेश.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: