७ मार्च, २०१८

#बंद आणि फलित.


       काल आमच्यातला शिवाजी आणि भीमराव खऱ्या अर्थाने जागा झाला हा, जितका त्यांच्या जयंतीला देखील होत नसेल. त्यामुळे डोकं गहाण ठेवलेली माणसं आपल्या गुवाला किती सुगंध आहे आणि दुसऱ्यांच्याला किती दुर्गंध आहे हे दाखवण्यासाठी व्हॉटसअपवर आपापल्या धर्माचे~महापुरुषांचे समर्थन करणाऱ्या पोस्टी टाकत होते. अश्यातच एक व्हिडिओ पहिली ज्यात एका कोवळ्या पोराच्या हातात दगड (जातीय आक्रोशाचा) होता नी ते पोरं  हल्लेखोरांना मारायला निघालेले काहीसं चित्र होत. पोरगं आमचं, चित्रीकरण केलं आम्ही, त्याला शिकवलं आम्हीच, ज्यातून आम्हाला उद्याच्या भावी पिढीचं उघडं~नांगड प्रदर्शन पाहायला मिळालं. असो.
  काल महाराष्ट्र बंद झाला. मोठ्या धूम धडाक्यात झालं म्हणायचं. आता किती मोठ्या धुमधडाक्यात झालं  हे आपल्याला (कोकणवासी) जरा उशिरा समजेल...जात्यात धान्य ज्या प्रमाणे भरडलं जातं, त्याप्रमाणे भरडणाऱ्या पोलिसांना विचारा, `त्यांच्या` आणि `ह्यांच्या` भांडणात निष्पाप पोळलेल्या माणसांना विचारा आणि बंद करणाऱ्या `बंद`खोरांनाच विचारा, किती मोठ्या धुमधडाक्यात. आजच्या बंदमुळे काय मिळालं हे मला माहित नाही, पण हातावर कमवून पोटाची खळगी भरण्यासाठी कालचा दिवस मेल्यातच गेला, लोकांच्या टपरी पाडून पोटरी भरण्याचे वांदे केलेत, माईंची जयंती आणि शाळा~महाविद्यालये बंद, गाड्यांच्या काचा फोडून सामान्यांच्या वाचा बंद केल्यात, सेकंद काट्यावर खेळणाऱ्या मुंबईकरांचे डोळे घरी जाण्यासाठी तास काट्याकडे खिळवून ठेवलेत आणि उद्याच्या पिढीवर जातीयवादाचे दोन थेंब शिंपडून देखील गेलात. एरवी मोठ्या अभिमानाने सांगतो आम्ही, आमच्या बापाने संविधान लिहिलं आहे मग त्याच संविधानाचा आधार घेत आम्हाला न्यायालयात न्याय मागता आलं असतं किंवा रस्त्याच्या एका बाजूने शांततापूर्ण मोर्चा देखील काढता आलं असतं पण नाही ते करून थोडं आम्हाला दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात पहिल्या पानावर झळकता आलं असतं.
    असं बंद जर प्रत्येक समूहाने उद्या काढले तर मला वाटतं सरकारी सुट्ट्यापेक्षा बंदच्या सुट्ट्या ह्या जास्त असतील. फक्त मुंबईत ट्रान्सपोर्ट सेक्टर ला ह्या बंदमुळे 2000 कोटी चा फटका बसला असच जर संपूर्ण महाराष्ट्राचं पाहिलं तर डोळ्यासमोर दिवसाढवळ्या  कल्पनेतली हजारो  बीटकॉईंस चमकतील इतकं नुकसान झालं आहे. तुमच्यावर झालेल्या हल्ल्याचं इलाज म्हणून तुम्ही जो बंद पुकारलात त्यामुळे न जाणो कित्येक सर्वसामान्यांना जखमा झाल्या असाव्यात. आता जखमा झालेल्या  ह्याच सामान्य माणसांनी उद्या महाराष्ट्र बंद पुकारला तर तो शमवण्याची टाकत तुमच्या ढुंगणात आहे का?? नाही ना?? मग जरा विचार करा की हो.. जर AC त बसलेल्या एका माणसाचा तुम्ही इतका विचार करत असाल तर AC ( Alternative Current)रेल्वे ने प्रवास करणाऱ्या लाखो लोकांचा विचार तुम्ही का नाही करत.? तुमचं काय घोडे मारले आहेत त्यांनी ?? दिवसभर दंगा, जाळपोळ करून मग संध्याकाळी त्यांच्यावर ``बंद मागे घेत आहोत. बंद 100% यशस्वी झाला. जनतेचे आभार.`` अश्या वाक्यांनी गुलाबपाणी शिंपडायचे. पण द्वेषाने जळणारा हा जीव खरचं तुमच्या ह्या गुलाबपाण्याने शांत होणार आहे का? स्वतःच्या हिमतीवर जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण दुसऱ्यांच्या पोटावर मारून जगण्याचा अधिकार कोणालाही नाही...कोणालाही नाही...
#दुनिया_झुकती_हैं_झुकानेवाला_चाहिए_|
©मोरे_गणेश.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: