पोस्टचं शिर्षक वाचून काहींच्या मनात बाहुबली या महाचित्रपटाचे बार फुटत असतील;पण बाहुबली ची जाहिरात करण्याचा कोणताही माझा मानस नाही आहे.121 कोटी शिरसंख्या असलेल्या देशात 1 चित्रपट एका दिवसाला 121 कोटी कमावतो म्हणजे थोडक्यात त्या माणसांना बाहुबलीची भाषा उत्तम रित्या समजते अस समजून त्याच भाषेत आपल्या `नंदनवनाची` बरबटलेली परिस्थिती तुमच्या समोर मांडण्याचा स्वार्थ हेतु आहे.असो.
`काश्मीर` म्हटल्यावर देशप्रेमींना काही काळ का होईना सैनिकांची आठवण येते,काश्मीर म्हणजे वृत्तवाहिन्यांसाठी TRP साठीच प्रमुख स्रोत,काश्मीर म्हणजे आपल्यासाठी नंदनवन आणि नव जोडप्याला मधुचंद्राची मौज लुटण्याच नीरव ठिकाण.पण मला विचाराल तर काश्मीर म्हणजे बारमाही दिवाळी होणार भारतातील एकमेव ठिकाण ज्यामुलं आमच्या सैनिकांच दिवाळ निघत.जिथे रोज `आझादी` लिहिलेले दगड जरी आकाशात भिरकवतले गेले असले तरी ते झेलावे लागतात ते आमच्याच जवानांना.काश्मीर,जिथे 2 आठवडे ओस पडलेली महाविद्यालये मोठ्या उमेदीने चालू होतात तेव्हा मुलांच्या/मुलींच्या कोवळ्या हातात लेखणी नाही तर धोंडे असतात.काश्मीर मधल्या जमावाचं संरक्षण कसरत असतानाच त्या जमावाकडूनच सैनिकांची हेटाळणी होते अश्या परिस्थितीत सैनिकाच्या हातात गन असून सुद्धा त्याला कमालीचं संयम बाळगावा लागतो.गेल्या 3 वर्षात 172 वेळा दहशतवादी हल्ले,1343 वेळा ना`पाक` कडून शस्त्रसंधीचा भंग झाला आहे,ह्यात 91 नागरिकांचा बळी आणि 198 जवान शाहिद झाले.
असे हे आपले `भळभळते` नंदनवन आहे.
अजूनपर्यंत चर्चा-संवाद करून आजचं मरण उद्यावर टाकण्याचं काम झालं आहे.ह्या सगळ्या प्रश्नांवर मोदीच काश्मीर चे तारणहार आहेत असे बोलून मेहबुबा मुफ्ती यांनी PM ना बहुबलीची भूमिका दिली आहे.आणि ते त्यांना साजेसही आहे कारण काश्मीरच्या राजकारणाचा रिमोट श्रीनगर ना असून दिल्लीत आहे.सर्गिकल स्ट्राईक करून मोदी सरकारने चित्रपटाचा फक्त ट्रेलर दाखवला आहे.आता हा चित्रपट केव्हा आणि कसा दाखवणार हे जेवढे उत्सुकतापूर्ण आहे तेव्हढेच महत्वपूर्ण सुद्धा आहे,कारण प्रत्येक विनाशकारी गोष्टीवर conclusion/शेवट हा असायलाच पाहिजे. म्हणूनतरच `PoK The conclusion:20??...
©मोरे गणेश.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा