१९ फेब्रु, २०१८

#जगण्याचं अभिव्यक्तीस्वातंत्र्य...


              कोणाची झोप मशिदितल्या  सकाळच्या अजानाने उडते,,काहींना झोप लागत नाही कारण त्यांचे आशावादी डोळे सरकारच्या कर्जमुक्ती खिळून राहिले आहेत तर काहींना झोपायची इच्छा असून सुद्धा झोपू शकत नाही कारण त्यांचे डोळे सव्वाशे कोटी जनतेच्या विश्वासावर दडून राहिले आहेत.पहिल्या माणसाची झोप सोडल्यास राहिलेल्या दोन माणसांच्या झोपेचं काय ? कोण देणार त्यांना त्यांच्या झोपेचं स्वतंत्र.? BSF चे जवान तेज ब. यादव यांनी सैन्यातील भ्रष्ट अधिकाऱ्याची `डाळ शिजवून` दिली नाही म्हणून त्याला नारळ देण्यात आलं , नारळ देण्यात नाही फोडण्यातच आला म्हणा की त्याच्या घरी बसण्याचा. देशाची राजधानी दिल्ली जिथून UPSC चा टॉपर बाहेर पडतो तिथे एका एअर फोर्स च्या अधिकाऱ्याला भर चौकात मारले जाते.डोळ्यांना पाहावेल (कारण व्हाट्स अँप वर विडिओ टाकायचं असतं ना) पण कानांना ऐकवणार नाही असं दृश्य आम्ही बघे साऊथ चा सिनेमा पाहावं तस पाहत होतो.
         महा. शेतकऱ्याला सरकारकडे  कर्जमुक्तीची मागणी करून घशाला कोरड पडली तर तमिळनाडूचा शेतकरी ह्याच मागणीने घशाला पडलेली कोरड मूत्रप्राशन करून भागवत आहे.जगाच्या पोशिंदयाची ही अशी विदारक अवस्था आहे. सहाव्या वेतन वरून आम्हाला सातव वेतन लागू होऊल, भत्यात वाढ होईल,आणि बरंच काही मिळेल आणि शेतकऱ्याला त्याच्या वाटनीच पण मिळत नाही.
       असो...सैनिकांना व शेतकऱ्याला पाठींबा देण्यात कसलं आलंय धैर्य हो.पंचपक्कवांनी भरलेले ताट घेऊन LED च्या डोळ्यात डोळे घालून IPL पाहताना धोनीने असं करायला पाहिजे होत नि तस करायला पाहिजे होतं म्हणजेच त्याला मनसुबे शिकवण्यातच आपण धन्यता मानतो. भरलेलं हे ताट जेव्हा रिकामं होईल तेव्हा आपले डोळे उघडतील आणि ह्या निरव शांततेत जेव्हा दहशतवादाच्या टिमक्या ऎकायला येतील तेव्हा आपले कान उघडतील.आपण जरी स्वतंत्र झालो असतो तरी `ते` अजून पारतंत्र्यातच आहेत. म्हणून द्या ना त्यांना त्यांच्या जगण्याचं `अभिव्यक्तीस्वातंत्र्य`..!
©मोरे_गणेश.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: