परवाच मी S.Y.(B.Sc.) च नोंदणी करून आलो.आमच्या निमविचारी घोलक्यात अनेक जण जातीवरून आरक्षण मिळाल्याने/न मिळाल्याने एकमेकांविरोधात स्तुतीसुमने उधळत होते. ``साल्यांनो तुमचं बर आहे हजारात काम होत,अायला आम्हाला जाम घासायला लागते ; कधी मिळतय देव जाणे``.आणि माझ्या डोक्यात डोकावलेले प्रश्न काही वेगळेच होते.मला आरक्षनाचा नाही तर त्याचा योग्य उपयोग होत नाही या गोष्टीची चीड वाटते.मी अमुक_अमुक जातीचा_धर्माचा आहे ही भावना मनात ठेऊन पोस्ट वाचू नका तर ; मी एक संविधानाच्या चौकटीत वलवलणारा स्वार्थी मनुष्यरुपी किडा आहोत ही भावना ठेऊन ही पोस्ट वाचा.
समाजातील अशक्त व्यक्तींना सशक्त बनवण्यासाठी उभारलेली ही `आरक्षणाची खानावळ`.काही माणसं डायनिंग टेबलवर वर तर काही माणसं जमिनीवर जेवायला बसली आहे.तर काही माणसं हातात ताट घेऊन घासभर खायला मिळेल या आशेने वाढप्याकडे कपाळाला आठ्या पाडून बघत आहे.आणि काही माणसं भुकेने व्याकुळ झाली आहेत तरी सुध्दा त्यांना खानावळीत प्रवेश दिला जात नाही ;आणि ही सगळी परिस्थिती उघड्या डोळ्यांनी पाहत असताना,पुढ्यातील भरलेलं ताट मटकावून झाल्यानंतर डायनिंग टेबलवरून आईसक्रीम ची मागणी करणारे आवाज येत आहे.सहानभूतीच हे उघडं नांगड प्रदर्शन.
अशा प्रकारे अशक्त माणसे सुदृढ झाली तरी अजूनही कुपोषितग्रस्त असल्याच ते देखावा करत आहेत.खाणारे `तुपाशी` आणि राहणारे `उपाशी`मरत आहे.आणि वाढप्यानच्यात इतकीही हिंमत नाही की ते जेऊन झालेल्या माणसांना उठवतील आणि भुकेलेल्या माणसांना बसवतील कारण वाढप्यानचे `पोट` हे जेवायला बसलेल्या माणसांच्या `वोट` वर भरते.त्यामुळे जेवायला बसलेल्या , रांगेत उभे असलेल्या आणि ज्यांच पोट भरल आहे अश्या सगळ्यांना उद्देशून एकच विनंती,आरक्षण हे फक्त भुकेलेल्या माणसांसाठी आहे,म्हणून ज्यांना भूक लागली आहे त्यांनीच जेवायला बसा.आपली भूक खरंच भागली असेल तर आवरता घ्यायला हरकत नाही.तुमच्या मागे खुपजन उभे आहेत हो.संविधानाच पहिलं पान हे फक्त वाचण्यासाठी नाही तर `करून दाखवण्यासाठी` आहे.घटिकेसोबत माणसं बदलली आणि त्यांची प्रवृत्तीही;मग आता विचारही बदलायला नको का.???
©मोरे_गणेश.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा