पुस्तकाचे नाव – वपुर्झा.
पुस्तकाचे लेखक – व.पू.काळे.
`वपुर्झा`. व. पू. लिखित हे पुस्तक. काही दिवसांपूर्वीच हे पुस्तक वाचायला हाती घेतलं, आणि विशेषतः हेच पुस्तक हाती घेण्याचं कारण म्हणजे, अधून-मधून `वपुर्झा` मधील काही उतारे विविध माध्यमांतून नजरेस पडत होते. किंबहुना काळजात शिरत होते. ते उतारे वाचतांना `व .पु.` यांच्याबद्दल दिवसेंदिवस आदर आणि प्रेम वाढतच जात होता. मग कधी मी ते पुस्तक ग्रंथालयातून घेतो आणि वाचतो असं झालं होतं. पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे पुस्तकाला शिर्षक नाही, संदर्भ नाही का अनुक्रमणिका नाही. जिथून आपल्याला वाटेल तिथून हे पुस्तक आपण वाचू शकतो आणि आपल्याला पाहिजे तेव्हा. जीवनात चालताबोलता घडणाऱ्या गोष्टींचे विवेचन वपुंनी वेगळ्या आणि विनोदी शैलीत केले आहे. पुस्तक वाचताना मी प्रथमतः पुस्तकाच्या मुखपृष्टाचे निरीक्षण केल्यास मला असे वाटते की मुखृष्ठावरील रिकामा काचेचा पेला आकाशाचा शब्द झेलण्यासाठी आहे, मनातली साठलेली जळमट स्वतःबद्दलच्या भ्रामक कल्पना दूर केल्या तर हा रिता पेला आपल्या नवं विचारांनी भरेल आणि हा रिकामा पेला म्हणजे आपले नवनवीन विचार त्यात ओतण्यासाठीच प्रतिक आहे असं प्रस्तावनेत सांगितलं आहे आणि ते खरं देखील आहे.
हे पुस्तक आपल्याला आपण आपल्या नातेवाईकांसोबत, मित्रमंडळींसमावेत आपले वर्तन कसे असावे या बद्दल मार्गदर्शन करते. प्रामुख्याने संसारातील पती पत्नीच्या गोड तिखट नात्याचे विनोदी रंगात आपले मत मांडले आहेत. हे पुस्तक वाचल्यानंतर माझा समाजातील विविध घटनांकडे आणि वस्तुंकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. सकाळी उठल्यापासून ते अगदी पार झोपेपर्यंत जो घटना क्रम असतो तो सूचीबद्ध आणि मोजक्या शब्दात मांडलेला आहे. माझ्या मते, व.पुं. च्या लेखनाची खासियत म्हणजे वाचकाला क्षणभर थबकावून विचार करण्यास भाग पडणे, गोष्टी इतक्या साध्या अन सोप्या शब्दात मांडल्या आहेत की, वाचतांना असं वाटल्यावाचून राहणार नाही की, `माझ्यासोबातही हेच घडलं होतं (अथवा घडत आहे), पण मी ह्या दृष्टीकोनातून कधीच असा विचार केला नव्हता, नाहीतर मी देखील हा सकारात्मक उपाय योजू शकलो असतो`. ह्या सगळ्याची प्रचिती पुस्तक वाचताना येतेच.
पुस्तक वाचताना एक परिच्छेद वाचून झालं की हा प्रसंग आपल्या पण आयुष्यात घडलेला आहे याची भनक येते. पुस्तकात अनेक सुभाषिते आली आहेत ही ठळक अक्षरात नमूद केली आहेत. काही विचार करायला लावणारी तर काही मनाला स्पर्श करणारी. `कबुतराला गरुडाचे पंख लावताही येतील पण गगनभरारीचे वेड हे रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही` हे सुभाषित मला जास्त आवडलं ,काही तरी नवीन करण्याची ऊर्जा त्यातून मिळते.
हे पुस्तक वाचून मला जणू काही मला क्रियाविशषनांचा आहेरच मिळालं आहे असं मी म्हणेन.अनेक जुन्या नवीन शब्दसमूहांची तोंडओळख झाली.एका वेगळ्या जगाची तोंडओळख झाली असच म्हणावे लागले. खरचं खुप वेगळा अप्र्यक्षरीत्या अनुभव मिळाला.आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे पुस्तक वाचून माझ्या ज्ञानाच्या कक्षा थोड्याफार प्रमाणात रुंदावल्या आहेत. खरचं पुस्तक वाचून खुप छान वाटलं.

©मोरे_गणेश.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा